रोजंदारी कर्मचारी आज आदिवासी कार्यालयावर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:32+5:302021-02-10T04:15:32+5:30

आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेत काम करणाऱ्या वर्ग तीन व चार तासिका रोजंदारी सेवक गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ...

Hired employees will hit the tribal office today | रोजंदारी कर्मचारी आज आदिवासी कार्यालयावर धडकणार

रोजंदारी कर्मचारी आज आदिवासी कार्यालयावर धडकणार

Next

आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेत काम करणाऱ्या वर्ग तीन व चार तासिका रोजंदारी सेवक गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आश्रमशाळांमध्ये काम करीत आहेत. मानधनावरील या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन आदिवासी विभागाने दिलेले आहे. मात्र, त्यांना सामावून घेण्यात आलेले नाही. शिवाय गेल्या जून महिन्यापासूनचे वेतन देखील दिलेले नाही. त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी संतप्त झाले असून, आंदेालन छेडण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

काही प्रकल्पांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना शाळेवर हजर करवून घेण्यात आले. त्यानुसार अन्य शिक्षकांनादेखील सामावून घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे व आत्मदहनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर रितेश ठाकूर, हेमंत पावरा, कमलाकर पाटील, रवींद्र पाटील, बी. जी. पाडवी, ए. एस. वाडीले, एच. एल. बिरारी यांनी निवेदन दिले आहे.

Web Title: Hired employees will hit the tribal office today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.