ऐतिहासिक पिसोळ किल्ला दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:55 AM2018-02-17T00:55:06+5:302018-02-17T00:55:31+5:30
बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे.
औंदाणे : बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे. येथील गाव व ऐतिहासिक पिसोळ किल्ला तालुक्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा पुरातन किल्ला आहे. या किल्ल्याला सुमारे पाच वर्षांपूर्वी पर्यटनाबाबत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे व पाण्याच्या टाक्या व प्रवेशद्वार यांची दुरुस्ती झाली आहे, परंतु अर्धवट काम झाले असून, जैसे थे परिस्थती दिसल्याचे चित्र आहे. किल्ल्यावर पुरातन वास्तू अद्याप जपून ठेवल्या आहेत. मजबूत घराची ठेवण, महाराजांच्या पाऊलखुणा आहेत. पाण्याच्या टाक्या, दही दुधाच्या टाक्या आहेत. घोडयावरून जाणाºया पाऊलखुणा, खिंडही आहे. पोळा सणाच्या दुसºया दिवशी पर्यटक किल्ल्यावर येतात. पर्यटकांना भुरळ घालणारा हा किल्ला आहे. गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतर आहे. जनावरे चारण्यासाठी शेतकरी किल्ल्यावर येतात. वेली, फुलांनी व सिताता फळांनी, गवताने हा परिसर नटलेला आहे. पर्यटनस्थळ झाल्यास गावाचाही विकास होऊ शकतो. तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे.