प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:13 AM2019-07-30T01:13:56+5:302019-07-30T01:15:10+5:30

गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात असून, सदर रथ मंगळवारी (दि.३०) जुने सीबीएस येथे येणार आहे.

 The history of ST will be revealed from the exhibition | प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास

प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास

Next

नाशिक : गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात असून, सदर रथ मंगळवारी (दि.३०) जुने सीबीएस येथे येणार आहे.
एस.टी.च्या निर्मितीला ७१ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी सेवेत वेळोवेळी केलेले बदल आणि दिलेल्या सुविधा याविषयीचा आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील प्रमुख ५० शहरांमधून परिवहन महामंडळाचे हे प्रदर्शन फिरविले जाणार आहे.
बदलांचा इतिहास सांगणारी क्षणचित्रे व ‘वारी लाल परीची’ असे घोषवाक्य असलेला महामंडळाचा चित्ररथ दि. ३० रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे, तर दि. ३१ रोजी मालेगाव येथे या रथाचे आगमन होणार आहे.
भारतातील सर्वात मोठ्या प्रवासी परिवहन सेवेची माहिती जनतेला मिळावी, यासाठी सदर रथ महामंडळाने तयार केला आहे. मागील काही वर्षांमध्ये बससेचा आकार, रंगसंगती आणि अंतर्गत रचनेत अनेक बदल करण्यात आलेले आहेत.
लाल पिवळ्या बसेसपासून ते शिवशाही आणि बसस्थानकांपासून ते बसपोर्ट असा मोठा पल्ला गाठणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडणार आहे. या प्रदर्शनात जुन्या बसेसची छायाचित्रे, माहिती फळक, जुनी स्थानके, तिकिटे, आदींची सचित्र माहिती मांडण्यात येणार आहे.
सदर प्रदर्शनाचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे. सदर प्रदर्शनासाठी शाळांनादेखील पाचारण करण्यात आले असून, अनेक शाळांचे विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता आहे. प्रदर्शन दिवसभर सुरू राहणार असल्याने नाशिककरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनदेखील मैंद यांनी केले आहे.
प्रदर्शनातून माहिती
सदर प्रदर्शन मंगळवारी (दि.३०) सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत जुने सीबीएसवर भरविण्यात येणार आहे, तर दि. ३१ रोजी याच वेळेत मालेगावातील नवीन बसस्थानकात सदर प्रदर्शन भरविले जाणार आहे. एसटीची निर्मिती आणि प्रवासी सेवेतील स्थित्यंतरे, स्पर्धेला तोंड देत असताना करण्यात आलेले बदल आणि सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती या प्रदर्शनातून प्रवाशांना मिळणार आहे.

Web Title:  The history of ST will be revealed from the exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.