वाहनचालकावर ‘हिट अॅण्ड रन’चा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:08 AM2018-04-14T01:08:03+5:302018-04-14T01:08:44+5:30
पंचवटीत देवदर्शनासाठी आलेले व गंगाघाटावर झोपलेल्या उत्तर प्रदेशातील बांदा येथील भाविकाला भरधाव कारने चिरडल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलिसानी तपास करून संबंधित कारचालकाविरोधात हिट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला आहे़
नाशिक : पंचवटीत देवदर्शनासाठी आलेले व गंगाघाटावर झोपलेल्या उत्तर प्रदेशातील बांदा येथील भाविकाला भरधाव कारने चिरडल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलिसानी तपास करून संबंधित कारचालकाविरोधात हिट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मरौली येथील रहिवासी रामबाबू भुराराम आरख (खंगार) हे कुटुंबीयांसह पंचवटीत देवदर्शनासाठी आले होते. म्हसोबा पटांगणात रात्रीच्या सुमारास ते कुटुंबीयांसह झोपलेले असताना भरधाव आलेल्या कारने (एमएच १५ एफटी २५५३) त्यांचे वडील भुराराम आरख (खंगार) (वय ६९) यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला़या अपघाताची पंचवटी पोलिसांनी सखोल चौकशी करून वाहनचालकास शोधून काढले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.