पांडाणेत सोयाबीनला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 03:53 PM2019-11-05T15:53:39+5:302019-11-05T15:54:12+5:30
पांडाणे : अतिवृष्टीमुळे दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील मोहन दौलत बहिरम यांच्या दोन एकरमधील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे.
पांडाणे : अतिवृष्टीमुळे दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील मोहन दौलत बहिरम यांच्या दोन एकरमधील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे.
मोहन बहिरम यांनी पांडाणे शिवारातील गट नं. ६० मध्ये दोन एकरात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. त्यात सुरुवातीला पावसाच्या आदी वीस क्ंिवटल सोयाबीन येणारच या हिशेबाने खत व औषधांची फवारणी करून सोयाबीन पीक तयार केले होते. त्यांना एकरी वीस हजार खर्च आला होता. त्यात बियाणे, शेताची मशागत,पेरणी असा एकूण खर्च आला होता; परंतु दीड महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. सोंगणी करून ठेवलेला सोयाबीनही पाऊस सुरू असल्यामुळे पूर्ण पाण्यात सापडल्यामुळे सोयाबीन मळणी केल्यानंतर परिपूर्ण काळी झाली. दोन एकरात ऐंशी ते नव्वद किलो सोयाबीन ही काढणी केल्यानंतर कोळशासारखी निघाल्यामुळे दुकानदार घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ती खळ्यात ओतून दिली आहे. नुकसान झालेल्या पिकाची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.