कट्ट्यावरील बाकांवर आॅईलचा मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:10 PM2020-04-02T17:10:30+5:302020-04-02T17:10:47+5:30
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना देशात सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही ग्रामीण भागात ग्रामस्थ विनाकारण पार- कट्ट्यावर नागरिक गप्पा मारताना दिसून येत आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी बसू नये म्हणून वडांगळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कट्ट्यांवरील बाकांवर आॅइल टाकण्यात आले आहे.
वडांगळी : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना देशात सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही ग्रामीण भागात ग्रामस्थ विनाकारण पार- कट्ट्यावर नागरिक गप्पा मारताना दिसून येत आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी बसू नये म्हणून वडांगळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कट्ट्यांवरील बाकांवर आॅइल टाकण्यात आले आहे.
बँक आॅफ महाराष्ट्रच्या वडांगळी शाखेत रोखीने व्यवहार करण्यासाठी खातेदार शिस्तीने रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. बंजारा समाजाचे आराध्यदैवत असलेले सतीमाता- सामतदादा मंदिर बंद करण्यात आले आहे. दरम्यान, लोकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा सुरु आहेत. तथापि, टायर पंक्चरचे दुकान बंद असल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर दुकानांचा जीवनावश्यक गोष्टीत समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.