मास्क न वापरणाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 11:25 PM2021-03-25T23:25:12+5:302021-03-26T01:11:38+5:30

अभोणा : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता प्रशासन यंत्रणा कार्यरत असताना शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

Hit those who don't use masks | मास्क न वापरणाऱ्यांना दणका

अभोणा येथील चौफुली परिसरात विना मास्क फिरणाऱ्या दुचाकी व नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करताना गटविकास अधिकारी बहिरम, डॉ. पाटील, सपोनि म्हस्के आदी.

Next
ठळक मुद्देअभोण्यात गटविकास अधिकारी यांनी केली कारवाई

अभोणा : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता प्रशासन यंत्रणा कार्यरत असताना शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

कोरोनाचा फैलाव वाढू नये तसेच लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे. यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रबोधन केले जात असले तरीही काही नागरिक बेफिकिरी दाखवीत आहेत. शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रांताधिकारी विकास मिना यांच्या मार्गदर्शनाने कळवण पंचावत समितीचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, अभोणा ग्रामविकास अधिकारी जीभाऊ जाधव तसेच सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी शहरात तसेच अभोणा चौफुलीवर धडक मोहीम राबविली.

अवघ्या तासाभरात ५० व्यक्तींकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला. तर प्रतिबंधित क्षेत्रात व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्या तीन व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जीभाऊ जाधव यांनी दिली.
 

Web Title: Hit those who don't use masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.