अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:35 IST2020-12-02T23:19:35+5:302020-12-03T00:35:28+5:30
लासलगाव : लासलगाव- मनमाड रस्त्यावर वाल्मीक होदक वस्तीजवळ मालेगाव तालुक्यातील सोनज टाकळी येथील शिवाजी रामराव घोंडगे (३५) या मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार
ठळक मुद्देअज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
लासलगाव : लासलगाव- मनमाड रस्त्यावर वाल्मीक होदक वस्तीजवळ मालेगाव तालुक्यातील सोनज टाकळी येथील शिवाजी रामराव घोंडगे (३५) या मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी घोंडगे हे टीव्हीएस स्टार या दुचाकीने (क्र. एमएच ४१ एएल ८२८९) मनमाडकडून लासलगावकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. याबाबत वाहेगावसाळ येथील पोपट सोनवणे यांनी लासलगाव पोलिसांना खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.