येवला येथे विनाकारण फिरणाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:39 PM2020-04-30T18:39:14+5:302020-04-30T18:39:39+5:30

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असून, या दरम्यान, शासकीय आदेशाचा भंग करणा-या ३१३ व्यक्तीविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, तब्बल ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 Hit Yeola for no reason | येवला येथे विनाकारण फिरणाऱ्यांना दणका

येवला येथे विनाकारण फिरणाऱ्यांना दणका

Next

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असून, या दरम्यान, शासकीय आदेशाचा भंग करणा-या ३१३ व्यक्तीविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, तब्बल ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.  शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असतानाही काही तरुण व व्यावसायिक उल्लंघन करत असल्याचे दिसून येत होते. शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, युवराज आठरे आणि सहकाऱ्यांनी लॉकडाउन व संचारबंदीचे नियम पाळण्याबाबत शहरवासीयांना आवाहन केले. काहींना समजही दिली. मात्र, विनाकारण फिरणारे, दुचाकी वाहनावरून फेरफटका मारणारे थांबेना म्हणून पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत २२ एप्रिल ते ३० एप्रिल या ९ दिवसांत शहर पोलिसांनी ३१३ व्यक्तींविरुद्ध लॉकडाउन व संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करून तब्बल ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.  या मोहीमेत सुमारे ३५ वाहनही शहर पोलिसांनी जप्त केली आहेत. शहर पोलिसांच्या या अ?ॅक्शनमोडमुळे शहरातील विनाकारण फिरणारे व मोकाट दुचाकीवरून फिरणाºयांची संख्या आता रोडावली आहे.

Web Title:  Hit Yeola for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक