पिळकोस परिसरात पोळा हा सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:44 PM2020-08-19T14:44:00+5:302020-08-19T14:46:59+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस सह परिसरात पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस सह परिसरात पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजा व बैल यांच्यातील जीवाभावाचे ऋ ण व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे बैल पोळा. यावेळी गावातील शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांनी या मिरवणुकीत नाचून आपला बैलांप्रतीचा आनंद व्यक्त केला. सायंकाळी ग्रामदैवत मारु तीरायाला भेटवून त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैल पोळा सण पारंपारिक पद्धतीने साजरा झाला.
ग्रामीण भागात बैल पोळा या सणाला आजही अनन्य साधारण महत्व असून काळाच्या ओघात शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या जरी कमी झालेली असली तरी पोळा सणाचे महत्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पूर्वी गावातील बहुतेक शेतकऱ्यांकडे दोन बैल जोड्या असत, त्यानंतर बैलाच्या वाढलेल्या किमती व शेतकºयांकडील जमिनीचे घटलेले शेत्र पाहता एका शेतकºयाला एक जोडी दिसू लागली. तर आज शेतीत झालेले यांत्रिकीकरण पाहता शेतकºयांकडील बैलजोड्यांची जागा टॅक्टरने घेतली असून आज ठराविक शेतकºयांकडेच बैल जोडी दिसून येत आहे. तरी देखील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधव, शेतमजूर हे एकत्रित येत बैल पोळा उत्साहात साजरा झाला.