कर्कश हॉर्नमुळे अंडरपास बनला कानठळ्यांचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:29+5:302021-09-17T04:18:29+5:30
नांदगाव : आधीच अरुंद असल्याने वादात पडलेला येथील अंडरपास सध्या रहदारीमुळे तासन्तास जाम होत आहे. गुरुवारी ११ वाजता ...
नांदगाव : आधीच अरुंद असल्याने वादात पडलेला येथील अंडरपास सध्या रहदारीमुळे तासन्तास जाम होत आहे. गुरुवारी ११ वाजता कोंडी झालेली रहदारी तब्बल दोन तास थबकली होती. येण्या - जाण्यासाठी दोन्हीकडे चढ व उतार आहे. चढावर थांबून थांबून मागे सरकणारी वाहने व ती अंगावर येताना बघून भीती वाटणाऱ्या मागच्या वाहनचालकांच्या कर्कश हॉर्नमुळे अंडरपास कानठळ्यांचे आगार बनला. रहदारी नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणा नाही. नगरपरिषद प्रशासनाला घेणे-देणे नाही. त्यामुळे मोले घातले रडाया... तक्रार नाहीचे कारण पुढे करायचे. असा खाक्या पोलीस व नगरपरिषद यांनी ठरविलेला दिसतोय. अरुंद सब-वेच्या मानवनिर्मित कोंडीवर पोलीस व परिषद दोघांनी तोडगा काढायला हवा. पण समस्या आमची नाही, अशी भूमिका दोघाही यंत्रणेची दिसते. लोकांना साध्या साध्या मूलभूत गरजांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. वाहनांची ही अवस्था तर पायी चालणाऱ्यांचे विचारायलाच नको. त्यांना जागाच नाही. कोपरे दाबण्याच्या मानसिकतेत असलेले व्यावसायिकांनी वळणावरच आपले बस्तान मांडले असल्याने पायी जाणाऱ्यांना किंवा वाहनचालकांसमोर संकट उभे राहिले आहे.
------------------
नांदगावच्या अंडरपासमध्ये झालेली रहदारीची कोंडी. (१६ नांदगाव १)
160921\16nsk_12_16092021_13.jpg
१६ नांदगाव १