‘एटीएम’कार्ड चोरटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:14 AM2017-09-22T00:14:31+5:302017-09-22T00:15:08+5:30

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी वृद्ध महिला-पुरुषांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत फसवणूक करणारा चोरटा अखेर पोलिसांना सापडला. गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने माग काढत पाळत ठेवून या एटीएममधील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.

Hold ATM card stolen | ‘एटीएम’कार्ड चोरटे ताब्यात

‘एटीएम’कार्ड चोरटे ताब्यात

Next

नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी वृद्ध महिला-पुरुषांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत फसवणूक करणारा चोरटा अखेर पोलिसांना सापडला. गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने माग काढत पाळत ठेवून या एटीएममधील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील एका लॉजमध्ये आश्रयास असलेला माधव बापू अहेर (२६, मूळ रा.कसबे सुकेणे) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन वेगवेगळे एटीएम क ार्ड हस्तगत करण्यात आले. सदर कार्ड संबंधित बॅँकेमध्ये जाऊन पोलिसांनी पडताळणी केली असता त्या कार्डधारकांचा पोलिसांना पत्ता लागला. कार्डधारक व्यक्तींनी सदर संशयित चोरटा माधव यास तत्काळ ओळखले. एटीएम केंद्रात मदत क रण्याच्या बहाण्याने नजर चुकवित एटीएम कार्डची अदलाबदल करून पिनकोडवर लक्ष ठेवून हा चोरटा दुसºया एटीएममध्ये जाऊन पैसे लुटत होता, अशी माहिती देवडे यांनी दिली. या संशयिताकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.

Web Title: Hold ATM card stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.