सरसकट पंचनामे करण्यासाठी धरणे
By admin | Published: March 5, 2016 10:37 PM2016-03-05T22:37:12+5:302016-03-05T22:42:39+5:30
इगतपुरी : शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीचे आंदोलन, कांद्याला हमीभाव देण्याची मागणीं
इगतपुरी : जिल्ह्यातसह तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे
करावे, कांद्याला हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते फिरोज पठाण यांच्या प्रमुख उपस्थीत येथील तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष गोरख बोडके व शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी केले होते.
अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा हतबल झाला आहे. नुकसानीचे पंचमाने करून त्वरित भरपाई द्यावी व कांद्याच्या भावात वाढ झाल्यास भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. सद्यपरिस्थितीत कांद्याचे भाव कमी झाल्याने सरकारने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारूंगसे, बाळासाहेब गाढवे, नामदेव वाक्चौरे, नगरसेवक धनंजय पवार, यशवंत दळवी, नरेंद्र कुमरे, आशा थोरात, ता. रा. वि. कॉ. अध्यक्ष किरण मुसळे, डॉ.
श्रीराम लहामटे, श्रीकृष्ण वारुंगसे, ज्ञानेश्वर फोकणे, संतोष जगदाळे, विलास सानप, विष्णू
चव्हाण, नियाज खलिफा, वसिम सय्यद, नारायण वळकंदे, मदन कडू, पोपट भागडे, ज्ञानेश्वर शिरसाठ, बाळा बोंडे, किरण राऊत, सुशील भोंडवे, किरण राऊत, बाळासाहेब सद्गुरू, विलास जगताप, ज्ञानेश्वर शिरसाट आदि उपस्थित होते. (वार्ताहर)