वाहन खरेदीसाठी आयुक्तांना साकडे
By admin | Published: September 2, 2016 12:19 AM2016-09-02T00:19:11+5:302016-09-02T00:19:20+5:30
बच्छाव : समाजकल्याण आयुक्त सिंह यांना निवेदन
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय सेस निधीअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी चारचाकी मालवाहतूक वाहन खरेदीसाठी पाठविलेल्या प्रस्तावास समाजकल्याण विभागाने मान्यता द्यावी, असे साकडे समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी समाजकल्याण आयुक्त पीयूष सिंह यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पातील २० टक्के रक्कम ही समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी खर्च करावयाची आहे. यानुसार लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी वाहन पुरविण्याच्या योजनेस जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. मात्र ही योजना राबविण्यासाठी आयुक्तांची तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी १२ आॅक्टोबरला प्रादेशिक समाजकल्याण उपआयुक्तांकडे पाठविले आहे़