नोंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By admin | Published: April 21, 2017 11:48 PM2017-04-21T23:48:56+5:302017-04-21T23:49:13+5:30
नांदगाव : तलाठ्याच्या नोंद न टाकण्याच्या जाचामुळे लक्ष्मीनगरचे शेतकरी बापूसाहेब जाधव यांच्यावर बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे
नांदगाव : तलाठ्याच्या नोंद न टाकण्याच्या जाचामुळे लक्ष्मीनगरचे शेतकरी बापूसाहेब जाधव यांच्यावर बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला असून, तहसीलदार ते तलाठी व बँक यांचे उंबरे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या जाधव यांनी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी साकडे घातले आहे. नोंदीसाठी तलाठ्याने पैसे मागितले, ही जाधव यांची तक्र ार आहे.
बापूसाहेब जाधव यांनी २५ एप्रिल २०१६ रोजी खरेदी केलेल्या जमिनीची ८ ड ची नोंद करण्यासाठी तलाठी आर. यू. देशमुख गेले
वर्षभर टाळाटाळ करत असून, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांचा आदेशही त्यांनी धुडकावून लावला आहे. एवढेच नव्हे तर नोंद होण्याआधीच खोटा ७/१२ चा उतारा जाधव यांना देऊन फसवणूक केली आहे.
गेल्या महिन्यात तहसीलदार देवगुणे यांच्याकडे जाधव यांनी कैफियत मांडली. त्यावेळी
देवगुणे यांना दोन दिवसात नोंद करून देतो असे सांगून तलाठी देशमुख यांनी सुटका करून घेतली. मात्र
महिना उलटून गेला तरी नोंद केली नाही. तहसीलदारांच्या आदेशाची ही अवस्था आहे तिथे सामान्यांना न्याय कसा मिळावा.
जाधव यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामासाठी त्यांना पीककर्ज घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर महसुली अन्याय होत आहे.
याविरुद्ध उपोषणास बसण्याची जाधव यांची तयारी आहे. या सर्वांचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर झाला असून, जिवाचे कमीजास्त झाल्यास तलाठी जबाबदार राहतील, असा इशारा जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केला आहे. (वार्ताहर)