मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे महिलांची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:50 PM2020-02-24T23:50:01+5:302020-02-25T00:21:09+5:30
नागरिकत्व सुधारित कायदा, एनआरसी व एनपीआर कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे शहरातील इस्लामाबाद येथील महिलांनी धरणे आंदोलन केले.
मालेगाव मध्य : नागरिकत्व सुधारित कायदा, एनआरसी व एनपीआर कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे शहरातील इस्लामाबाद येथील महिलांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी मनपा स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ म्हणाले, केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या काद्यामुळे संविधानाच्या आत्म्यावरच घाला घातला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच जातीच्या आधारवर कायदा बनवून अंमलात आणला. एका विशिष्ट समाजाला लक्ष केले गेले आहे. त्ाीन तलाकमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय केला जात असे म्हणून त्यांचे हक्क मिळवून देत त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तीन तलाक कायद्याने संरक्षण देण्याची भाषा करणाऱ्यांना आज शाहीनबागमध्ये आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी बसलेल्या मुस्लिम बघिनी दिसत नाहीत का? यावेळी महिलांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. संघटनेचे निमंत्रक नगरसेवक अब्दूल माजीद, माजी महापौर अब्दूल मालीक, हाजी हनिफ साबीर, मुख्तार आदिल, नगरसेविका सादिया लईक अहमद यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.