वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीकडून होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:15 PM2020-07-30T17:15:23+5:302020-07-30T17:15:50+5:30
निफाड : गेल्या ३ महिन्याचे घरगुती आणि कृषी पंपाचे आलेल्या भरमसाठ वीज बिलाबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल,े त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली.

निवेदनात म्हटले आहे की निफाड तालुक्यातील घरगुती विज ग्राहकांना व शेतकर्यांच्या कृषी पंपांना भरमसाठ वीज बिले वीज वितरण कंपनीकडून दिली गेलीआहेत दिल्लीच्या शासनाप्रमाणे घरगुती वीज 200 युनिट प्रमाणे माफ करण्यात यावी तसेच शेतकर्यांच्या वीज पंपांना पूर्ण वीज मोफत द्यावी. निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली.
निफाड तालुक्यात शेतकर्यांना युरिया, सुफलाया खतांची टंचाई भासत असून या खतांचा सुरळीतपणे पुरवठा करावा या मागणीचे निवेदन कृषी अधिकारी बटू पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष उत्तम निरभवने, उपाध्यक्ष सुरेश देवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, अॅड. संतोष पगारे, भीमराज साळुंखे, वाल्मिक कापसे, राहुल सूर्यवंशी, विकी सूर्यवंशी, राजेंद्र बागुल, बाळू तडवी, अशोक जाधव, प्रमोद निरभवणे आदी उपस्थित होते.