पाताळेश्वर विद्यालयात व्यसनाधीनतेची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 06:27 PM2019-03-21T18:27:56+5:302019-03-21T18:28:31+5:30

पारंपरिक होळी सणानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात व्यसनाधीनता निर्मूलनाची होळी पेटवून सामाजिक संदेश देण्यात आला. भ्रष्टÑाचारमुक्ती तसेच व्यसनाधीनतेची होळी शाळेच्या आवारात पेटविण्यात आली.

Holi of the addict of Pataleshwar Vidyalaya | पाताळेश्वर विद्यालयात व्यसनाधीनतेची होळी

सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात व्यसनाधीनता निर्मूलनाची होळी पेटवून सामाजिक संदेश देण्यात आला.

googlenewsNext

सिन्नर : पारंपरिक होळी सणानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात व्यसनाधीनता निर्मूलनाची होळी पेटवून सामाजिक संदेश देण्यात आला. भ्रष्टÑाचारमुक्ती तसेच व्यसनाधीनतेची होळी शाळेच्या आवारात पेटविण्यात आली.
तंबाखु, गुटखा, सिगारेट व सिगारेटची पाकिटे जमा करत त्याची होळी पेटविण्यात आली. प्रत्येकाने स्वताच्या घरी, तसेच कोणी व्यसन करत असताना आढळल्यास त्याला विरोध करून समज देण्याची शपथ यावेळी देण्यात आली. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी पर्यावरण पूरक तसेच प्रदुषण विरहीत होळी करण्याविषयी माहिती दिली. यावेळी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे , ए. बी. थोरे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Holi of the addict of Pataleshwar Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.