शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:01+5:302021-03-27T04:15:01+5:30
नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत पंजाब व हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर २६ ...
नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत पंजाब व हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबर २०२०पासून आंदोलन उभारले असून, या आंदोलनाला चार महिने पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर किसान सभा व बहुजन शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि. २६) नवीन कृषी कायद्यांच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. तर काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत देशातील वाढत्या महागाईचा निषेध केला.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी देशभरात जनजागृती व्हावी आणि शेतकऱ्यांनी राष्ट्रीय आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी शुक्रवारी (दि. २६) भारतीय किसान मोर्चाने देशव्यापी बंदची हाक दिली होती. मात्र, या ‘भारत बंद’ला नाशिकमधील शहरी भागात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात शनिवारी आणि रविवारी बाजारपेठांमध्ये बहुतांश सर्वच व्यवहार बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सलग तीन दिवस बंद टाळण्यासाठी शुक्रवारी दुकाने व अन्य दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरू ठेवल्याने शहरी भागात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना काळात शेतकरी, कामगार, व्यापारीविरोधी कायदे केले असून, बँक, एल. आय. सी., रेल्वेचे खासगीकरण करून विक्री करत असल्याचा आरोप करत विविध शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र येत नाशिक रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नवीन कृषी कायद्याच्या प्रतीची होळी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्व आंदोलकांनी काँग्रेस कमिटीसमोरील धरणे आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष शरद आहेर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राजू देसले, नगरसेवक समीर कांबळे, बबलू खैरे, उद्धव पवार, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, हनिफ बशीर, रमेश पवार, विजय राऊत, बळवंत गोडसे, रौफ कोकणी, अनिल बहोत, जावेद इब्राहिमस इसाक कुरेशी, संजय पाटील, वंदना पाटील, भारती गीते, प्रमोद धोंगडे, सुमन महाले, गिरीष चौघुले, धनंजय कोठुळे तसेच शेतकरी आंदोलनाचे विराज देवांगे, नितीन मते, स्वप्नील धिया आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
इन्फो
काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व वाढत्या महागाईविरोधात शुक्रवारी (दि. २६) नाशिक शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटीतर्फे सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत धरणे आंदोलन करत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याचप्रमाणे देशात सातत्याने महागाई वाढत असून, गॅस, पेट्रोल, डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव केंद्र सरकारने तत्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
===Photopath===
260321\26nsk_17_26032021_13.jpg~260321\26nsk_18_26032021_13.jpg
===Caption===
१) दिल्लीती शेतकरी आंदोलाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये किसान सभा व बहूजन शेतकरी संघटनेतर्फे नवीन कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. याप्रसंही अशोक पालकर, रमेश औटे, बळवंत गोडसे, नामदेव बोराडे आदी२) काँग्रेस कमिटी समोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करताना जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, बबलु खैरे आदी~१) दिल्लीती शेतकरी आंदोलाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये किसान सभा व बहूजन शेतकरी संघटनेतर्फे नवीन कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. याप्रसंही अशोक पालकर, रमेश औटे, बळवंत गोडसे, नामदेव बोराडे आदी२) काँग्रेस कमिटी समोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करताना जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, बबलु खैरे आदी