मालेगावी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी; निषेधाच्या घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 08:55 PM2020-06-17T20:55:53+5:302020-06-18T00:30:04+5:30
मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षातर्फे चीनच्या प्रधानमंत्र्याचे छायाचित्र व चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. लडाख सीमेजवळ चीनकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा निषेध येथील भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला.
मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षातर्फे चीनच्या प्रधानमंत्र्याचे छायाचित्र व चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. लडाख सीमेजवळ चीनकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा निषेध येथील भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला. भारतीय सीमेत घुसखोरी करून चीनने पाठीत खंजीर खुपसला आहे. आताही सैन्य मागे घेत दबावाचे धोरण अवलंबिले असून, त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी चिनी वस्तूंवर भारतीय नागरिकांनी बहिष्कार घालावा, या नंतर स्वदेशी मालाचीच खरेदी करावी, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, नीलेश कचवे, उपाध्यक्ष लकी गिल, हरिप्रसाद गुप्ता, सलीम पिंजारी यांनी मांडले. शाहिद वीर जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
---------------------
भारत माता की जय, वंदे मातरम्
चीनचे राष्ट्रपती सी. जिंगपिंग यांची छायाचित्रे तसेच चिनी मालाची होळी करण्यात आली. यावेळी वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, चीनचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.