वीजदेयकांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:39 AM2018-08-11T00:39:10+5:302018-08-11T00:42:02+5:30
नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली.
नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली.
महावितरण कंपनीने महाराष्टÑ राज्य नियामक आयोगास वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सकाळी विद्युत भवन येथे निमा, आयमा, लघु उद्योग भारती, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, स्टाइश- सिन्नर व शेतकरी संघटनांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत व महावितरणचा निषेध करत वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी महावितरण नाशिक परिमंडलचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्याशी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदनही दिले. स्थिर आकार लागू करून महावितरण छुपी दरवाढ करत आहे. शासनाची फसवणूक करून महावितरण चुकीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करत आहे.
या आंदोलनात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, महाराष्टÑ चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आयमा अध्यक्ष वरुण तलवार, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, ग्राहक पंचायतीचे अरुण भार्गवे, दत्ता शेळके, सुधीर कारकर, धनंजय बेळे, शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, नितीन रोटे पाटील, राजेंद्र आहिरे, सुदर्शन डोंगरे, आर. एम. पवार, जे. आर. वाघ, सुधीर बडगुजर, विरल ठक्कर, रवींद्र झोपे, राजेंद्र कोठावदे, जयेश महाले, दीपक जाधव, जयंत पवार, सिद्धार्थ सोनी, विलास देवळे, उदय रकिबे, संजय महाजन, संदीप भदाणे, किरण वाजे आदी सहभागी झाले होते.
महागडी वीज
खासगी कंपन्याकडून महागडी वीज खरेदी करू नये, शेतकऱ्यांना चुकीचे वीज बिल देऊ नये, शहर-जिल्ह्यातील ग्राहकांना मागणीनुसार वीजमीटर उपलब्ध करून देण्यात यावे, सरासरी बिल न देता मीटर रिडिंग घेऊन बिल देण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
४विविध संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करत व महावितरणचा निषेध करत वीज बिलाची होळी करण्यात आली.