शहा विद्यालयात पर्यावरणपूरक होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:29 PM2020-03-10T17:29:02+5:302020-03-10T17:30:10+5:30

पाथरे: सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता करून त्याची होळी साजरी केली.

 Holi environmentally friendly in Shah school | शहा विद्यालयात पर्यावरणपूरक होळी

शहा विद्यालयात पर्यावरणपूरक होळी

Next

यावेळी मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी होळी सणाचे महत्व पटवून देत परिसरातील स्वच्छता ठेवून, मनातील वाईट विचारांची यानिमित्ताने होळी करावी असे आवाहनही केले. उपशिक्षक सलीम चौधरी यांनी विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची तसेच शालेय परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचीही शपथ दिली. विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा पाच एकरचा परिसर स्वच्छ केला. हा सर्व कचरा जाळून होळी सणाचा आनंद घेतला. याप्रसंगी प्राचार्य सुनील गडाख, शमीरु ल्ला जहागीरदार, नारायण वाघ, सलीम चौधरी, रमेश रौदळ, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रविंद्र कोकाटे, बाळासाहेब कुमावत, राजेंद्र गवळी, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, बरखा साळी, मेधा शुक्ल, विश्वनाथ ठोक, सुरेखा गुरु ळे, सचिन रानडे, रवींद्र डावरे, जगन शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title:  Holi environmentally friendly in Shah school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.