पंचवटीत होलिकोत्सव साध्या पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 01:34 AM2021-03-29T01:34:21+5:302021-03-29T01:34:39+5:30
होळी रे होळी पुरणाची पोळीऽऽ असा जयघोष करून मोजक्या महिला भगिनींनी फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत पारंपरिक वेशभूषा करून होळीचे पूजन केले. रविवारच्या दिवशी सायंकाळी हुताशनी पौर्णिमा होलिकोत्सव उत्साहात; पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
पंचवटी : होळी रे होळी पुरणाची पोळीऽऽ असा जयघोष करून मोजक्या महिला भगिनींनी फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत पारंपरिक वेशभूषा करून होळीचे पूजन केले. रविवारच्या दिवशी सायंकाळी हुताशनी पौर्णिमा होलिकोत्सव उत्साहात; पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
पंचवटीत महिला युवतींनी होळीचे विधिवत पूजन केले. महिलांनी होळीभोवती शेणसडा करून रांगोळी काढली होती. रंगीबेरंगी हारडे चढवून हळद, कुंकू वाहून मुहूर्तावर पूजन करत होळी पेटवून महिलांनी पुरणपोळी नैवेद्य दाखविला. होलिकोत्सव साजरा करण्यासाठी मित्रमंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळ पासून तयारी केल्याचे दिसून आले. संध्याकाळी होळी जागा पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली. त्याठिकाणी शेणसडा करत गोवऱ्या रचून रांगोळी काढण्यात आली. होळी पूजनानंतर श्रीफळ वाढवून गोवऱ्या-लाकडांची होळी पेटविली. हिरावाडी, गंगाघाट, गजानन चौक, जुना आडगाव नाका, गजानन चौक, पाथरवट लेन, सेवाकुंज, कृष्णनगर, सरदारचौक, शनिचौक, नवीन आडगाव नाका, काट्या मारुती चौक, तारवालानगर, नागचौक, बंजारमाता मंदिर, शिवाजी चौक, मालवीय चौक, म्हसरूळ, राममंदिर परिसर, त्रिमूर्तीनगर, कमलनगर, अयोध्यानगरी, आडगाव, आरटीओ, मेरी, दिंडोरीरोड, पेठरोड, मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूर - मानूर, भागातील मित्रमंडळांनी होळी कोरोना नियम पालन करून साजरी केली.