सिन्नर शहर, तालुक्यात होळी सण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:20 PM2020-03-10T17:20:18+5:302020-03-10T17:21:49+5:30

सिन्नर: शहर व तालुक्यात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी होळीभोवती रांगोळी काढून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येत होता. विविध देवतांच्या मंदिरासमोर सार्वजनिक होळी साजरी करण्यात आली. होळीची मनोभावे पूजा करुन दु:ख, दारिद्रय, वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याची प्रार्थना करण्यात आली.

 Holi festival in Sinnar city, taluka | सिन्नर शहर, तालुक्यात होळी सण उत्साहात

सिन्नर शहर, तालुक्यात होळी सण उत्साहात

googlenewsNext

ग्रामीण भागात होळीचा विशेष उत्साह दिसून आला. होळीसाठी लाकूडतोड करण्याचे प्रमाण कमी झाल्याचेही दिसून आले. शेणाच्या गोवऱ्यांची होळी करण्यात आल्याचे दिसून आले. सायंकाळी चौकाचौकात सडा व रांगोळीने परिसर स्वच्छ करण्यात आला होता. होळीभोवती फुलाचा हार व हारकडे घालण्यात आले. महिलांनी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. येथील लोंढे गल्लीत भद्रकाली मंदिरासमोर सर्वात मोठी गोवऱ्यांची होळी करण्यात आली होती. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या सार्वजनिक होळी साजरी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Web Title:  Holi festival in Sinnar city, taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.