इगतपुरीच्या पूर्व भागात होळी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 10:46 PM2022-03-17T22:46:52+5:302022-03-17T22:47:42+5:30
गोंदे दुमाला : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथे मारुती मंदिरांसमोर व घरांसमोर पूजन करीत होळी पेटविण्यात आली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. काळाच्या ओघात बऱ्याच पारंपरिक प्रथांचा विसर पडत चालला असला तरी ग्रामीण भागात होळीच्या सणाचे महत्त्व टिकून असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
ठळक मुद्दे ग्रामीण भागात होळीच्या सणाचे महत्त्व टिकून असल्याचे चित्र
गोंदे दुमाला : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथे मारुती मंदिरांसमोर व घरांसमोर पूजन करीत होळी पेटविण्यात आली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. काळाच्या ओघात बऱ्याच पारंपरिक प्रथांचा विसर पडत चालला असला तरी ग्रामीण भागात होळीच्या सणाचे महत्त्व टिकून असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
यावेळी होळी साजरी करताना होळी सणाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. बळीराजाला सुख-समृद्धी ऐश्वर्य लाभू दे, असे शुभचिंतन करीत होळी रे होळी पुरणाची पोळी असा बालगोपाल यांच्या वतीने व उपस्थित नागरिकांच्या वतीने नारा देण्यात आला.