आडगाव रेपाळ येथे शासन निर्णयाची होळी
By admin | Published: June 29, 2017 12:52 AM2017-06-29T00:52:13+5:302017-06-29T00:52:27+5:30
येवला : राज्य शासनाने जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी ही तुटपुंजी असून, नियमित कर्ज भरणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : राज्य शासनाने जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी ही तुटपुंजी असून, नियमित कर्ज भरणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट दि. ३० जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत कुठलेच कर्ज न भरण्याचा ठराव करून कर्जमाफीच्या शासन निर्णय पत्राची होळी करण्यात आली.
यावेळी सरपंच आशाताई निकम, उपसरपंच नारायण गुंजाळ, खरेदी-विक्र ी संघाचे संचालक भागुजी महाले, माजी चेअरमन फकिरा निकम, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनंद महाले, निवृत्ती ठोंबरे, रमेश निकम, हनुमान काळे, पांडुरंग गायके , नवनाथ तनपुरे, बाळू तनपुरे, सुरेश बढे, गोरख जगताप, सुरेश जगताप, दत्तू गायके, माधव निकम, शंकर गुंजाळ, दत्तू मुरकुटे, राजेंद्र महाले, घमाजी तनपुरे, गंगाधर बढे, अरु ण मुरकुटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.