देवरगावला किसान सभेतर्फे वाढीव वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:43 PM2020-07-18T20:43:54+5:302020-07-19T00:57:33+5:30
चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने वीजबिलाची होळी करुन खताचा काळाबाजार त्वरीत थांबवावा अशी मागणी करण्यात आली तर कॉ राजु देसले यांनी सुरु केलेल्या शेतकरी शेतमजूर हक्क अभियान चांदवड तालुक्यात वीज बिल होळी देवरगाव येथे करण्यात आली.
चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने वीजबिलाची होळी करुन खताचा काळाबाजार त्वरीत थांबवावा अशी मागणी करण्यात आली तर कॉ राजु देसले यांनी सुरु केलेल्या शेतकरी शेतमजूर हक्क अभियान चांदवड तालुक्यात वीज बिल होळी देवरगाव येथे करण्यात आली. कोरोना काळातील शेतकरी घरगुती वापरातील वीज बिल माफ करा, मका खरेदी केंद्रात खरेदी सुरू ठेवा, कांद्याला पाचशे रुपये केंद्र सरकारने अनुदान द्या, कोरोना काळात थेट दहा हजार रु पये मदत करा, संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, पीककर्ज त्वरीत उपलब्ध करून द्या, विकास सोसायटी मजबुत करा, शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश रोजगार हमी योजनेत करा, मनरेगा मजुरांना तीनशे रुपये दररोजची मजुरी द्या आदी मागण्या किसान सभा वतीने करण्यात आल्या.
या प्रसंगी किसान सभा राज्य सचिव कॉ.राजु देसले,जेष्ठ नेते कॉ. अॅड.दत्ता निकम यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, तालुका अध्यक्ष अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, सुखदेव केदारे, विनायक शिंदे, अॅड. समीर शिंदे दशरथ कोतवाल, आदी उपस्थित होते. तर यावेळी किसान सभा हक्क अभियानाची माहिती दिली.
यावेळी रामुतात्या ठोंबरे, लहानु ठाकरे, निवृत्ती शिंदे, गणपत माळी, विष्णु त्र्यंबक , बबन क्षिरसागर, ज्ञानेश्वर शिंदे, नाना मोरे, अशोक मोरे, रावसाहेब शिंदे, किसन माळी आदिसह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित
होते.