निफाडला संचालकांकडून नोटिसांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:44 AM2018-07-02T00:44:55+5:302018-07-02T00:45:34+5:30
निफाड : तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांना कर्जवसुलीसाठी कारवाई करण्याबाबत निफाड तालुक्याचे सहकारी सहायक निबंधक देशपांडे यांनी बजावलेल्या नोटिसांची संचालकांनी रविवारी (दि. १) होळी करून निषेध नोंदवला.
निफाड : तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांना कर्जवसुलीसाठी कारवाई करण्याबाबत निफाड तालुक्याचे सहकारी सहायक निबंधक देशपांडे यांनी बजावलेल्या नोटिसांची संचालकांनी रविवारी
(दि. १) होळी करून निषेध नोंदवला.
सदर संचालकांकडून २ जुलै रोजी खुलासा मागवण्यात आला आहे. संचालकांना आलेल्या नोटिसींबाबत निषेध नोंदवण्यासाठी व पुढील कार्यवाही करण्यासाठी रविवारी (दि. १) निफाड मार्केट यार्डच्या सभागृहात राजेंद्र डोखळे यांच्या अध्यक्षतेखाली वि. का. सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष व संचालकांचा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी संचालकांनी मिळालेल्या नोटिसांची होळी केली. या मेळाव्याप्रसंगी नाशिक जिल्हा वि. का सोसायटी संचालक व चेअरमन फेडरेशनचे संस्थापक राजू देसले यांनी सांगितले की निफाड उपनिबंधक कार्यालयाने तालुक्यातील वि . का. सोसायटी संचालकांना बजावलेल्या नोटिसा चुकीच्या आहेत. संचालक कर्जवाटप करत असताना कर्जदाराला शिफारस करीत असतात. त्यानंतर जिल्हा बँक विभागीय अधिकारी मंजुरी देत असतो. सहकार कायद्याप्रमाणे सदर कर्जवाटप केले आहे. हे कर्ज तारणी आहे. त्याची विक्र ी होऊन जर वसुली कमी झाली तर संस्थेचे नुकसान झाले असे म्हणता येईल ती कारवाई न करता संचालकांना नोटिसा देऊन धमकण्याच्या हा प्रकार आहे .
राजेंद्र डोखळे यांनी सोसायटी संचालकांना उपनिबंधक कार्यालयाकडून आलेल्या नोटिसीचा निषेध व्यक्त केला. या प्रश्नाबाबत ४ जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विष्णुपंत गायखे, संपतराव वक्ते, नामदेव बोराडे, सोमनाथ बोराडे, राजाराम रायते यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिवाजी शिंदे, गणपत कानडे, विजय दराडे, भाऊसाहेब शिंदे, गणपतराव कुटारे, आनंद मोगल, भाऊसाहेब शिंदे, राजाराम तिडके, साहेबराव गुंजाळ, वामनराव सळुखे, शिवनाथ सोनवणे,सुखदेव केदारे, सुभाष निकम, राजाराम किरभाडे, भावराव पवार, प्रकाश धनाइत, नारायण गावित,दिलीप गायधनी, शिवाजी जिरे, प्रवीण पाटील, नरेंद्र चांदोरे, दत्तात्रय चांदोरे, अनिल ताजने, बबन मोरे, रामचंद्र जाधव आदी संचालक उपस्थित होते.
फोटो -