कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी

By admin | Published: June 19, 2017 12:21 AM2017-06-19T00:21:12+5:302017-06-19T00:21:33+5:30

शासनाकडून फसवणूक : शेतकऱ्यांना दिलासा नसल्याचा आरोप

Holi proposal for debt waiver | कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी

कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : फडणवीस सरकारच्या मंत्रिगटाचा तत्त्वत: निकषांच्या आधारावर सरसकट कर्जमाफीचा प्रस्ताव फसवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसल्याने शेतकरी वर्गात मोठा रोष निर्माण होत आहे. जर सुकाणू समितीने शासनाच्या अटी मान्य केल्या तर सुकाणू समितीला शेतकरी कदापि माफ करणार नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. सरसकट कर्जमाफी निर्णयाच्या निषेधचा भाग म्हणून निफाडच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रस्तावाच्या प्रतिची ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.
शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने सुकाणू समितीने तो मान्य करू नये त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांत जागृती करून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
कर्जमाफीचे निकष म्हणजे भाकरीपेक्षा भोकरच जड अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खातेफोड झालेली नसते. त्याच्याकडे ट्रॅक्टर तर असतोच. याशिवाय बाजार समितीत शेतमाल नेण्यासाठी कर्ज काढून जीप किंवा चारचाकी वाहन खरेदी अपरिहार्य आहे. हल्ली शहरात तर सर्वसाधारण व्यक्तीकडे वाहन असते. दुचाकीपेक्षा जुनी चारचाकी स्वस्त अन् प्रत्येक कोपऱ्यावर एजंटांनी त्याची दुकाने थाटलेली असतात. शेतीवर पोट भरत नाही म्हणून कोणी पानपट्टी गोळ्या बिस्किटांचे दुकान, पानटपरी काढली तर त्यालाही नोंदणी करावी लागते. उत्पन्न मात्र शंभर, दिडशे रुपयांवर नसते. त्यालाही कर्ज हवे तर बँका इन्कमटॅक्स रिटर्नची प्रत मागते, म्हणून युवक रिटर्न भरतात. आता हे सगळेच त्यांच्या मुळावर आले आहे. सरकारने शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवले आहे. त्यांनी कर्जमाफी देण्याची नव्हे तर टाळण्याची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याच्या प्रतिक्र ीया या कार्यक्र मावेळी व्यक्त करण्यात आल्या.
शेतकरी संपाविषयी नाशिकच्या तरुणांनी त्यात भाग घेऊन गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीच्या सदस्यांना हाताशी धरुन संप फोडल्यावरही त्याच्या सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया नाशिकमध्ये उमटून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. सध्या नाशिकमध्ये सोशल मीडियावर कर्जमाफीविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अतिशय कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सरकारवर टीका होत आहे. आजच्या आंदोलनाने कर्जमाफीच्या घोषणेला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, विविध राजकीय पक्षांकडूनही त्याचे समर्थन केले जात आहे.

Web Title: Holi proposal for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.