उपनगरांमध्ये होळी रे होळीऽऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:00 AM2019-03-21T01:00:14+5:302019-03-21T01:00:33+5:30
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण बुधवारी (दि.२०) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड आदींसह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून धार्मिक विधींसह होळीचे पूजन करण्यात आले.
नाशिक : हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण बुधवारी (दि.२०) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड आदींसह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून धार्मिक विधींसह होळीचे पूजन करण्यात आले. वाईट विचारांचे, अपप्रवृत्तीचे दहन करण्याच्या हेतूने संध्याकाळी जागोजागी होळ्या पेटवण्यात आल्या होत्या. सकाळपासून गोवऱ्या, लाकडे, हार-कडे, फुले, फुटाणे आदींच्या खरेदीसाठी बाजारात लगबग पहायला मिळाली. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात गोवऱ्या विक्रीस दाखल झाल्या होत्या. विविध मंदिरांपुढे तसेच नागरिकांकडून परिसरातील मुख्य चौकांमध्ये होळी पेटविण्यात आली. लहान व तरुण मुले होळीसाठी गोवºया, लाकडे जमा करण्यात मग्न होते.
दाजिबा वीराची मिरवणूक
बाशिंगे वीराबरोबरच शहराच्या फावडे गल्लीतून दाजिबा वीराची मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरू होते़ तांबट लेन, रविवार कारंजा, सरकारवाडा यामार्गे गंगाघाट येथे वीर मिरवणुकीने जातात. रामकुंडावरील होळीला प्रदक्षिणा घालून विधिवत पूजा करून हे वीर माघारी फि रतात़ रात्री १२ वाजता दाजिबा व बाशिंगे वीरांची भेट गंगाघाटावर होते़ बाशिंगे वीराप्रमाणेच दाजिबा वीराची आख्यायिका सांगितली जाते़