सुट्यांचा आठवडा; तीन दिवस कामकाज

By admin | Published: December 22, 2015 10:05 PM2015-12-22T22:05:21+5:302015-12-22T22:13:50+5:30

सुट्यांचा आठवडा; तीन दिवस कामकाज

Holiday week; Three days work | सुट्यांचा आठवडा; तीन दिवस कामकाज

सुट्यांचा आठवडा; तीन दिवस कामकाज

Next


कनाशी : या आठवड्यात शासकीय कार्यालये फक्त तीन दिवस सुरू राहणार आहेत. त्यानंतर सलग चार दिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुटीचा लाभ मिळणार आहे. गेल्या महिन्यात सलग सात दिवस सुट्यांचा आनंद शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला होता.
या आठवड्यात गुरुवारी (दि. २४) ईद-ए-मिलाद, शुक्र वारी (दि. २५) ख्रिसमस नाताळची शासकीय सुटी जाहीर झाली आहे. त्यानंतर येणारा दुसरा शनिवार व रविवारची साप्ताहिक सुटी अशा चार सुट्या लागोपाठ आल्या. त्यामुळे या आठवड्यात सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवशीच शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत.
या आठवड्यात सलग चार सुट्या आल्याने कर्मचाऱ्यांची पुन्हा या महिन्यात दिवाळीच साजरी होणार आहे. गेल्या महिन्यात सात दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या होत्या. ९ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, १० नोव्हेंबरला नरक चतुर्दशीची स्थानिक सुटी होती. त्यानंतर सलग तीन दिवस दिवाळीची सुटी होती.(वार्ताहर)

Web Title: Holiday week; Three days work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.