सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगडावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 03:11 PM2019-10-31T15:11:38+5:302019-10-31T15:11:48+5:30
त्र्यंबकेश्वर/वणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तर सप्तश्रृंगगडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
त्र्यंबकेश्वर/वणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तर सप्तश्रृंगगडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेउपाययोजना करण्यात येत आहे. दिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांचा कुणी पर्यटन स्थळी दर्शन तर कुणी तीर्थक्षेत्र दर्शन अशा प्रत्येकाच्या पसंतीने भाविक पर्यटक जात असतात. तसे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रही आहे व पर्यटनस्थळदेखील आहे. येथील गड-किल्ले, निसर्ग रमणीय प्रेक्षणीय स्थळे असल्याने पर्यटक येथे दोन्हीही स्थळांचा आवर्जून लाभ घेतात. त्यामुळे शहर गजबजले आहे.
सुट्ट्यांच्या कालावधीत देवदर्शन व पर्यटनाचे नियोजन आखून सहकुटुंब भटकंती करणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून, सर्वत्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
या पर्यटकांमुळे हॉटेल व्यावसायिक, पेट्रोलपंप, लॉजिंग, बोर्डिंग व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळी सण संपला असून, सध्या सुट्ट्यांचा कालावधी सहकुटुंब मजेत घालविण्यासाठी गुजरात राज्यातून वणी मार्गे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. सप्तशृंगगड, शिर्र्डी, शनि शिंगणापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर असे नियोजन गुजरात राज्यातील भाविकांचे असते. गुजरातमध्ये दिवाळीनिमित्त आठवडाभर व्यावसायिक, शैक्षणिक, चाकरमाने, मजूर, व्यापारी व तत्सम घटक रोजच्या नित्यक्र मातून वेळ काढत सण साजरा झाल्यानंतर देवदर्शन व पर्यटन करतात. खासगी वाहनांद्वारे इच्छितस्थळी जाण्याकरिता ते अग्रक्र म देतात. त्यामुळे सापुतारा-वणी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. ही सर्व वाहने अल्पोपाहार, भोजन, विश्रांतीसाठी हॉटेल्स परिसरात थांबत असल्याने हॉटेल व्यावसायिकांची उलाढाल वाढली आहे. दरम्यान, ज्याप्रमाणे गुजरात राज्यातील नागरिक पर्यटन व देववर्शनासाठी महाराष्ट्रात येतात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नगर, नाशिक भागातील नागरिकही गुजरात राज्यातील पर्यटन स्थळे पाहण्याकरिता जातात. त्यामुळे वणी-सापुतारा, वणी-नाशिक, वणी- पिंपळगाव या राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. राज्य क्र मांक १७ व राज्य क्र मांक २३ यांना यात्रेचे स्वरूप आले आहे.