हॉलिडे एक्स्प्रेसला अपघात; दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:44 AM2019-06-03T00:44:59+5:302019-06-03T00:45:17+5:30
बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या ०२०६२ या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे.
नांदगाव : बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या ०२०६२ या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे.
नांदगाव रेल्वेस्थानकाजवळ ही घटना आज सकाळी घडली. नादुरुस्त गाडी नांदगावस्थानकात थांबविण्यात आली होती. बरोली-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशल या वातानुकूलित गाडीच्या गार्डच्या अगोदरचा डब्याचे चाक तुटून पडले. ही घटना याच बोगीतून प्रवास करीत असलेल्या ओमप्रकाश मिश्रा यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ साखळी ओढून गाडी थांबविली. प्रवासींच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मध्य रेल्वेच्या देखभाल दुरुस्ती पथकाने नादुरु स्त बोगी बाजूला करून नांदगावस्थानकातील लूप साइडला गाडी आणली. या घटनेमुळे भुसावळ ते नाशिकदरम्यान धावणाºया अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. तीन तासांच्या तांत्रिक दुरु स्तीनंतर खोळंबून पडलेली वाहतूक दुपारनंतर पूर्वपदावर आली.
आज पहाटे भुसावळ स्थानकातून निघालेली ही गाडी इगतपुरीला थांबणार होती. मात्र पिंपरखेडस्थानक सोडून नांदगाव यार्डजवळ येत असताना डॉक्टरवाडी-बाभूळवाडी दरम्यान पोळ क्रमांक २२० जवळ या गाडीच्या बोगी क्र मांक बी१५च्या एका चाकाचा अर्ध्याहून अधिक भाग घर्षणातून झालेल्या अतिउष्णतेमुळे तुटून पडला. त्यातून मोठा आवाज होत भरधाव वेगात धावत असलेली गाडी हेलकावे खाऊ लागल्याने प्रवाशांत एकच घबराट उडाली.
गँगमनची सतर्कता : अपघात टळला, प्रवाशांच्या अंगावर भीतीचा काटा
गँगमन वाल्मीक बोराळे यांनीही हा प्रकार बघितला. त्यांनी तुषार पांडे व अन्य रेल्वेच्या वरिष्ठांना सदर घटना सांगितली. दरम्यान, याच बोगीतून प्रवास करीत असलेले ओमप्रकाश मिश्रा यांना सदर घटना लक्षात आली. त्यांनी तत्काळ साखळी ओढून गाडी थांबविली. त्यांनी बोगीचे अर्ध्यात तुटलेले चाक गार्डला दाखविले. गार्डने चालकाला व नांदगाव स्थानकात सदर घटना कळविली.
स्थानक प्रबंधक अग्रवाल यांनी त्यासाठी वेगळा प्लॅटफार्म उपलब्ध करून दिला. मनमाडचे वाणिज्य अधिकारी नाना भालेराव यांनी गाडीतल्या सर्व प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, चहा, बिस्किटे उपलब्ध करून दिले.
या गाडीच्या पाठोपाठ गोवा, सचखंड, पटना, महानगरी या गाड्या धावत होत्या. अपघातामुळे या गाड्यांना उशीर झाला. हॉलीडेने मन्याड नदीवरील ब्रिटिशकालीन पूल ओलांडला व काही किमी अंतरावर हा प्रकार घडला. हा अपघात पुलावर घडला असता तर या कल्पनेने प्रवाशांच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला.