बिबट्याने दिले दर्शन अन् शाळेला मिळाली सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:05 PM2017-08-20T23:05:29+5:302017-08-20T23:13:38+5:30
नाशिकमधील पंचवटी शिवारातील मेरी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्यामुळे चक्क येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारची सुटी प्रशासनाने जाहीर केली
नाशिक : नाशिकमधील पंचवटी शिवारातील मेरी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्यामुळे चक्क येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारची सुटी प्रशासनाने जाहीर केली आहे.
शहरातील म्हसरुळ जवळील मेरी भागात रविवारी दुपारनंतर काही रहिवाशांनी बिबट्या बघितल्याची अफवा परिसरात पसरली. सदर वार्ता ही अफवादेखील असू शकते; कारण वनविभागाच्या कर्मचाºयांनी संपूर्ण परिसर दिवसभर पोलिसांच्या साक्षीने पिंजून काढला; मात्र कुठेही बिबट्याचे नैसर्गिक पुरावे आढळून आले नाही. सतर्कता म्हणून रात्री देखील दोन कर्मचारी दर चार तासाने परिसरात गस्तीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. रविवारी दुपारी मेरीच्या एका शाळेच्या जवळच बिबटया काही नागरिकांनी बघितल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने धोका नको म्हणून सोमवारी शाळा नियमीतपणे भरणार नसून पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवू नये, अशी पोस्ट, फेसबूक, व्हॉटस्अॅपवरून व्हायरल केली. यामुळे सदर शाळेची घंटा सकाळी वाजणार नाही, हे निश्चित असले तरी बिबट्याने मात्र दर्शन दिले की नाही? हे अद्याप निश्चित झालेले नाही.
दुपारनंतर बिबट्याने दर्शन दिल्याचे काही नागरिकांनी म्हणणे आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी मेरीजवळील तारवालानगर परिसरात खाणाखुना शोधण्यास सुरूवात केली. दिवसभर कर्मचाºयांनी परिसर पिंजला; मात्र खात्रीशिर कु ठलेही नैसर्गिक पुरावे परिसरात वनविभागाला अद्याप आढळलेले नाही. पहाटेदेखील परिसरात जे नागरिक दिसतील त्यांच्याशीही संवाद साधला जाणार आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रात्रीच्या वेळी परिसरात बाहेर एकटे पडू नये, अथवा हातात विजेरी अन् काठी घेऊन बाहेर यावे, मात्र जंगलाच्या परिसरात जाऊ नये, खबरदारी घ्यावी.
- प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी