देवळयातील विद्यार्थ्यांना घरपोहोच पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 09:02 PM2020-06-15T21:02:48+5:302020-06-16T00:05:52+5:30

देवळा : शासनाकडून दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यावर्षी कोरोनामुळे शासनाचे शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नसल्याने सोमवारी (दि.१५) शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी मात्र, देवळा तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी माध्यमच्या १८ हजार ३९१ विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत पाठ्यपुस्तके घरपोहोच देण्यात आल्याची मागिती गटशिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.

Home delivery books for temple students | देवळयातील विद्यार्थ्यांना घरपोहोच पुस्तके

देवळयातील विद्यार्थ्यांना घरपोहोच पुस्तके

Next

देवळा : शासनाकडून दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यावर्षी कोरोनामुळे शासनाचे शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नसल्याने सोमवारी (दि.१५) शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी मात्र, देवळा तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी माध्यमच्या १८ हजार ३९१ विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत पाठ्यपुस्तके घरपोहोच देण्यात आल्याची मागिती गटशिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. यावर्षी कोरोनामुळे शाळा बंदच आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत विद्यार्थ्यांना घरपोहोच पुस्तके वितरित करण्यात येणार आहे. शाळांना तसे नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. देवळा तालुक्यात चार बीट असून, त्याअंतर्गत आठ केंद्र आहेत.
तालुक्यातील ११७ प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा यांना १५ जूनपूर्वी पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. वाटपाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी धनगर, शिक्षणविस्तार अधिकारी सतीश बच्छाव, नंदू देवरे, किरण विसावे, विजया फलके, उखा सावकार, एल. व्ही. सूर्यवंशी, बी. आर. निकम, एस. एन. जाधव, प्रियंका पगार, शीतल महाजन, केंद्रप्रमुख दिलीप पाटील, संजय ब्राह्मणकर, शिरीष पवार, रावबा मोरे आदींनी केले.
----------------------
त्र्यंबकला शाळा उघडल्या; पण शिक्षकांसाठी
त्र्यंबकेश्वर : शासनाच्या निर्णयाप्रमाणे सोमवारी (दि.१५) शाळा उघडल्या; मात्र केवळ शिक्षकांसाठीच. शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्र्यंबक तालुक्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रु ग्ण आढळलेला नसला तरी त्र्यंबकेश्वर तालुका याबाबत धास्तावलेला आहे. आधीच ९०/९५ टक्के शिक्षक मुख्यालयी न राहता त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथे राहतात. त्र्यंबकेश्वर येथे आज भीती नसली तरी नाशिक येथून अप-डाउन करणाऱ्या शिक्षकांपासून संसर्ग होईल या भीतीने त्यांच्या शाळेच्या उपस्थिती बद्दल पालकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. याशिवाय शाळेत गर्दी होईल, सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही यामुळे पाठपुस्तके घेण्यासदेखील कुणी आले नाही. अखेर शिक्षकांनीच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठपुस्तके वितरित केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट यांनी दिली. तालुक्यात आज २४५ शाळा आहेत. तर ७११ शिक्षक आहेत. यापैकी काही पदे रिक्त आहेत. ती पदे भरली गेल्यास विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.
------------------------------
खामखेड्यात पुस्तकांचे घरोघर वाटप
खामखेडा : येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तकांचे वाटप करून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. दरवर्षी शाळा सुरू झाल्या त्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात येत होते. परंतु चालू वर्षी कोयना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने यावर्षी शाळा अद्याप न उघडल्याने शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांंना अभ्यासा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आॅनलाईन अभ्यासमाला पाठविण्यात येतील असे सांगण्यात आले. पुस्तक वस्तू वाटप करताना सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्यात आले तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी पालकांना उपायोजना सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे याविषयी माहिती देण्यात आली.
------------------------
मनमाडला शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम
मनमाड : कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून पुढे येत असलेल्या मनमाड
शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाºया रु ग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी शहरात शाळेची घंटा वाजली नसली तरी कुठल्याही सूचना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असलेल्या येथील शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण देणेसुद्धा तारेवरची कसरत ठरणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रु ग्णसंख्येमुळे पालकांची मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. पुढील काही दिवसांत
सर्व सुरळीत झाल्यानंतर पाठ्यपुस्तक तसेच पोषण आहाराचे वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन तसेच आॅफलाइन धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे, आज प्रत्यक्ष शाळेची घंटा वाजली नाही.

Web Title: Home delivery books for temple students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक