कातरणीत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे घरपोच वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:07 PM2019-12-19T18:07:44+5:302019-12-19T18:08:29+5:30

पाटोदा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांची गरज भासते मात्र ऐनवेळी दाखले काढण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांची मोठी धावपळ होत असते .वेळेत दाखले मिळाले नाही तर शैक्षणिक नुकसानही होत असल्याने शाळेतच विद्यार्थ्यांंना दाखले उपलब्ध करून दिल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासाठी येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्र म राबविण्यात आला असून कातरणी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना वय अधिवास,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व जातींच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

 Home delivery of certificates to students in clipping | कातरणीत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे घरपोच वितरण

कातरणीत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे घरपोच वितरण

Next

यावेळी तहसीलदार वारु ळे यांनी मार्गदर्शन केले. निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द ,चिकाटी व मेहनत या गोष्टी असाव्यात, स्पर्धा परीक्षांची तयारी करून चांगले अधिकारी व्हावे असे आवाहन करून विविध शासकीय योजनांची माहिती द्यावी, जे दाखले बाकी असतील त्या विद्यार्थी व पालकांनी या समाधान शिबिराच्या माध्यमातून बनवून घ्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले . यावेळी नायब तहसीलदार प्रकाश बुरंगुळे, सेतू संचालक चेतन मोकळ, महा- इ सेवा संचालक नामदेव पगार, ग्रामस्थ चांगदेव कदम,बाबुराव ठाकरे ,बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब पानसरे,पोपट बारे, एस. एस. ठाकरे, बी. व्ही. आवारे, बी. बी. कदम, एस. एस. नरोटे, एस. आर. जगताप, व्ही. एन. येवले, श्रीमती संसारे, वैराळ, पाटील आदींसह ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट बारे यांनी तर एस. एस. नरोटे यांनी आभार मानले.

Web Title:  Home delivery of certificates to students in clipping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.