शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकवर्गाने दिली घरपोहोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:16 PM2020-06-16T21:16:26+5:302020-06-17T00:24:40+5:30
देवगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तकांचे वाटप केले. यावेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व तोंडाला मास्क लावून पुस्तकांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला पुस्तकांचा संच देऊन कोरोना महामारीबद्दल माहिती देण्यात आली.
देवगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तकांचे वाटप केले. यावेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व तोंडाला मास्क लावून पुस्तकांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला पुस्तकांचा संच देऊन कोरोना महामारीबद्दल माहिती देण्यात आली. आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी माहिती दिली. यावेळी पालक पोपट रोकडे, पांडुरंग दोंदे उपस्थित होते.
-----------------------------
मेशी : दरवर्षी सर्व प्राथमिक आणि माध्यमिक
शाळा १५ जूनपासून सुरू होतात; परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे त्या होऊ शकल्या नसल्या
तरी काही शाळांनी घरपोहोच पुस्तके वाटप केलीत. सध्या आॅनलाइन पद्धतीने वर्ग सुरू आहेत. परंतु या पद्धतीने शिकविणे सर्व ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात अडचणीचे ठरत आहे. अजून पंधरा दिवस तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रतीक्षा करावी
लागणार आहे.पेठ : शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने शिक्षण विभागाकडून पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. शाळा बंद असल्या तरी पेठ तालुक्यातील जवळपास १३ हजार मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तक वितरण गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, वसंत खैरनार, विलास साळी यांच्यासह विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
--------------------
काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील उत्तर पूर्व पट्ट्यातील खडकमाळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती शाळेस पहिल्या दिवशी कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट देण्यात आले. यावेळी जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते, संतोष रहाणे, बालरोगतज्ज्ञ डॉ.मंगेश रायते उपस्थित होते. १५ जून रोजी नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात कधी सुरू याबाबत अनिश्चितता आहे; मात्र शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आवश्यकता लक्षात घेत साहित्य भेट दिले. गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद असल्याकारणाने शाळा निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइड उपलब्ध करून दिले. यावेळी डॉ. मंगेश रायते यांनी प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, थर्मल स्कॅनरचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. ऋषिकेश रायते यांनी शाळा परिसराचे निर्जंतुकीरण केले. मुख्याध्यापक गोरख देवढे यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षक शशिकांत पाटील यांनी आभार मानले.