उद्यापासून घरांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण : नगर परिषदेच्या बैठकीत मालमत्ता कराविषयी महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी सिन्नरच्या मालमत्ताधारकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:52 AM2018-02-07T00:52:16+5:302018-02-07T00:53:02+5:30

सिन्नर : मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये जमा करणे, प्रारूप वाहतूक आराखडा मंजूर करणे या विषयांसह नगर परिषदेने मालमत्ता- धारकांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर केले.

Home Drown Surveys from tomorrow: Approval of important issues related to property tax at the meeting of the Municipal Council, relief to Sinnar's property holders | उद्यापासून घरांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण : नगर परिषदेच्या बैठकीत मालमत्ता कराविषयी महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी सिन्नरच्या मालमत्ताधारकांना दिलासा

उद्यापासून घरांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण : नगर परिषदेच्या बैठकीत मालमत्ता कराविषयी महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी सिन्नरच्या मालमत्ताधारकांना दिलासा

Next
ठळक मुद्देकर ३१ मार्चपूर्वी भरावा लागणारएकरकमी भरल्यास दंड माफ

सिन्नर : शहरातील मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये जमा करणे, शहराचा प्रारूप वाहतूक आराखडा मंजूर करणे या विषयांसह नगर परिषदेने मालमत्ता- धारकांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय मासिक बैठकीत मंजूर केले आहेत. माजी सैनिकांना राहत्या घराची ५० टक्के घरपट्टी माफ करण्यासह मालमत्ताधारकांनी मुदतीत कर भरणा न केल्यास होणारा दंड माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगर परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. तथापि, घरमालकाला थकीत कर ३१ मार्चपूर्वी भरावा लागणार आहे. नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात बैठक पार पडली. उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक शैैलेश नाईक, गोविंद लोखंडे, विजय जाधव, बाळासाहेब उगले, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव, सोमनात पावसे, श्रीकांत जाधव, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, प्रणाली गोळेसर, सुजाता भगत, विजया बर्डे, सुजाता तेलंग, गीता वरंदळ, नामदेव लोंढे, रामनाथ लोणारे, शीतल कानडी, प्रतिभा नरोटे, नलिनी गाडे, मंगला शिंदे, संतोष शिंदे, मल्लू पाबळे, सुहास गोजरे, चित्रा लोंढे, मालती भोळे, अलका बोडके, प्रीती वायचळे, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास आदींसह विविध खात्यांचे प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
पालिकेची मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. ती वसूल होण्यासाठी कर व त्यावरील व्याज आकारणी ३१ मार्चपूर्वी एकरकमी भरल्यास दंड माफ करण्यात येणार आहे. माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट देण्याची अनेक वर्षांची मागणी होती. सुमारे ७५० स्क्वेअर फूट घरासाठी मालमत्ता करात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, माजी सैनिक प्रत्यक्षात त्या घराचा वापर करत असणे अनिवार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ठरावास नगरसेवक नामदेव लोंढे यांनी पाठिंबा दिला. नवीन मिळकतींवर करात सवलतीसाठी अपील करताना ३० टक्के रक्कम दोन टप्प्यात भरण्याची सवलतही यावेळी देण्यात आली. शहरातील मोकाट जनावरांमुळे शहरातील वाढत्या अपघातांची समस्या दूर करण्यासाठी ही मोकाट जनावरे नाशिकच्या पांजरपोळमध्ये जमा करण्यास यापूर्वीच सभागृहाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी नगरपालिकेने जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी संबधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, शहराच्या विविध भागात होर्डिंग्जही लावण्यात आले होते; मात्र त्यानंतरही मोकाट जनावरे कमी झाली नसल्याने तातडीने ही जनावरे पांजरपोळकडे जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे बैठकीत ठरले. नगरपालिकेने पांजरपोळशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारानंतर पांजरपोळकडे जनावर गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अशी तरतूद या करारात करण्यात आली असल्याकडे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी लक्ष वेधले. नगरपालिकेच्या कोनांबे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेतून समृद्धी महामार्ग जाणार असून, नगरपालिकेची ८१ गुंठे जागा त्यात जाणार आहे. ही जागा योग्य तो मोबदला घेऊन या महामार्गासाठी हस्तांतरित करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. मोबदल्यापोटी येणारी रक्कम विकासकामासाठी खर्च न करता पाणीयोजनेच्या कामासाठी खर्च करावी, अशी सूचना नामदेव लोंढे यांनी मांडली. ही पाणीपुरवठा योजना पुढील ५० वर्षांचा विचार करून राबविण्यात येत असून, पुढे विस्तारीकरणाला अडचण येऊ नये म्हणून मिळणाºया मोबदल्याच्या रकमेतून जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच जागा खरेदी करावी अथवा शासनाची एखादी जागा असल्यास मोबदल्याऐवजी ती जागा घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. या सूचनेला सभागृहाने मंजुरी दिली.

Web Title: Home Drown Surveys from tomorrow: Approval of important issues related to property tax at the meeting of the Municipal Council, relief to Sinnar's property holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.