मालेगावी घरोघरी आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:24 AM2020-09-19T00:24:01+5:302020-09-19T01:33:36+5:30

मालेगाव : राज्यात शासनामार्फत कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रीपल टी त्रिसूत्रीचा वापर करून कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि कोविड मृत्युदर कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यभर सुरू असलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम शहरात राबविण्यात येत आहे.

Home health check-up in Malegaon | मालेगावी घरोघरी आरोग्य तपासणी

मालेगावी घरोघरी आरोग्य तपासणी

Next
ठळक मुद्देप्रत्येक ५ ते १० पथकांमागे १ डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : राज्यात शासनामार्फत कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रीपल टी त्रिसूत्रीचा वापर करून कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि कोविड मृत्युदर कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यभर सुरू असलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम शहरात राबविण्यात येत आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.२५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहील. मनपामार्फत एकूण ३४१ पथके मोहिमेसाठी तयार केली आहेत. त्या प्रत्येक पथकासाठी ७५ घरांच्या सर्वेक्षणाचे प्रतिदिवस इतके उद्दिष्ट असणार आहे. या आरोग्य पथकामध्ये प्रत्येकी १ आशासेविका, १ स्थानिक प्रतिनिधींचे स्वयंसेवक व २ शिक्षक असणार आहेत.
प्रत्येक पथक दररोज ६५ ते ७५ घरांना भेटी देऊन घरातील सर्व सदस्यांचे चाचणी करून उपचार केले जातील. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे १ डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देणार आहे. यावेळी उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी उपस्थित होते. अशी होईल तपासणी मोहीमघरातील व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इ. आजार आहेत का, याची माहिती घेऊन नोंद करण्यात येईल. तसेच शरीराचे तापमान जास्त असल्यास किंवा कोविडसदृश लक्षणे असल्यास जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात तपासणी करून संदर्भित करण्यात येईल. गृहभेटीद्वारे घरातील व्यक्तींचे तापमान मोजण्यात येईल.

Web Title: Home health check-up in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.