पिंपळगाव येथे घरोघरी आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:10 PM2020-04-15T23:10:51+5:302020-04-15T23:11:15+5:30
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोणाचा फैलाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये प्राथमिक लक्षणे आहे का? याची माहिती संकलित करण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीने आशा कार्यकर्त्या व अंगणवाडीसेविका आदींच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती आरोग्य अधिकारी चेतन काळे व ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी दिली.
पिंपळगाव बसवंत : शहरात कोणाचा फैलाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये प्राथमिक लक्षणे आहे का? याची माहिती संकलित करण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीने आशा कार्यकर्त्या व अंगणवाडीसेविका आदींच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती आरोग्य अधिकारी चेतन काळे व ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी दिली.
अंगणवाडीसेविका व आशा कार्यकर्त्या परिसरातील घरोघरी जाऊन माहिती संकलित करीत आहेत व नागरिकांनीही घरी माहिती घेण्यासाठी आलेल्या आशा, अंगणवाडी व आरोग्यसेविकांना संपूर्ण परिवाराची खरी माहिती द्यावी कोणतीही माहिती लपवू नये, या माहितीनुसार शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे, असे आरोग्य प्रशासनच्या वतीने सांगण्यात येत आहे. सर्वेक्षणात शिरीन मांदे, एस. डी. बागुल, सारिका बिडवे, वर्षा गांगुर्डे, प्रीती नाईक, वनिता अकोलकर, शारदा राऊत, संगीता शिरसाट, योगीता बनकर, सविता गवांदे आदींचा समावेश आहे.