निऱ्हाळे-फत्तेपूर गावातहोम टू होम तपासणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:03 PM2021-04-28T17:03:07+5:302021-04-28T17:03:41+5:30

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे- फत्तेपूर येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्र्वभूमीवर निऱ्हाळे-फत्तेपूर गाव ॲक्शनमोडवर आले असून गावात होम टु होम सर्व्हे मोहीम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेमुळे ग्रामस्थांचे मनोधैर्य उंचावले आहे.

Home to home inspection started in Nirhale-Fatehpur village | निऱ्हाळे-फत्तेपूर गावातहोम टू होम तपासणी सुरु

निऱ्हाळे-फत्तेपुर येथे होम टू होम सर्व्हे आरोग्य तपासणी करताना महिला कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देपॉझिटिव्ह रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे- फत्तेपूर येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्र्वभूमीवर निऱ्हाळे-फत्तेपूर गाव ॲक्शनमोडवर आले असून गावात होम टु होम सर्व्हे मोहीम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेमुळे ग्रामस्थांचे मनोधैर्य उंचावले आहे.

सरपंच मनिषा यादव, उपसरपंच विष्णु सांगळे व पदाधिकारी यांनी तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या निमित्ताने वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी छाया राशीनकर यांनी सांगितले.
सध्या सगळीकडे कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात संक्रमित रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिक संक्रमित झाले आहे. निहाळे-फत्तेपूर येथे रूग्णांनी अर्ध शतक पुर्ण केले आहे. अनेक पॉझिटिव्ह रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर अनेक जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
वाढत्या कोरोना संसर्गाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी गावातील आशासेविका व अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने होम टू होम सर्व्हे उपक्रम हाती घेतला आहे.
त्या अनुषंगाने गावातील सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन ऑक्सिजन पातळी, पल्स रेट, तापमान घेऊन तपासणी केली जात आहे.

रॅपिड ॲटीजेन चाचणी, कोवीड प्रतिबंधक लस याबाबत ग्रामस्थांची जनजागृती केली जात आहे. कुठलाही आजार अंगावर न काढता तातडीने आरोग्य केंद्रात येऊन उपचार घेतल्यास किंवा कोविडसदृश्य लक्षणं जाणवल्यास रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याचे आवाहन राशीनकर यांनी केले आहे.
होम टू होम सर्व्हे मोहिमेत आशासेविका माधुरी माळी, वंदना बैरागी, स्वाती बैरागी, अंगणवाडी सेविका स्वाती कोकाटे, शोभा सांगळे, जनाबाई सांगळे कार्यरत आहेत. त्यांना सरपंच व उपसरपंच, माजी सरपंच आण्णा काकड, कामगार पोलिस पाटील शिवाजी शिंदे व संगीता काकड, गणेश यादव, दत्तात्रय कळसकर आदींचे सहकार्य मिळत आहे.

 

Web Title: Home to home inspection started in Nirhale-Fatehpur village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.