पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीत गृहखात्याचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:36 AM2018-02-03T00:36:54+5:302018-02-03T00:39:50+5:30
नाशिक : महाराष्टÑ पोलीस अकादमीतून सन २००४ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेनुसार सन २०११ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीही देण्यात आली, परंतु पोलीस उपनिरीक्षकपदी अनुत्तीर्ण होऊनही सेवाज्येष्ठतेत खालच्या क्रमांकावर असलेल्या सहायक निरीक्षकांना थेट पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा मोठा घोळ राज्याच्या गृहखात्याने घातला असून, त्यासाठी सोयीने सेवाज्येष्ठता यादीत फेरफार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिक : महाराष्टÑ पोलीस अकादमीतून सन २००४ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेनुसार सन २०११ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीही देण्यात आली, परंतु पोलीस उपनिरीक्षकपदी अनुत्तीर्ण होऊनही सेवाज्येष्ठतेत खालच्या क्रमांकावर असलेल्या सहायक निरीक्षकांना थेट पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा मोठा घोळ राज्याच्या गृहखात्याने घातला असून, त्यासाठी सोयीने सेवाज्येष्ठता यादीत फेरफार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गृहखात्याच्या या अजब कारभाराने राज्यातील आठ ते दहा सहायक पोलीस निरीक्षकांवर मोठा अन्याय झाला असून, सहा महिन्यांपूर्वी सदरचा घोळ गृहखात्याच्या निदर्शनास आणूनदेखील पदोन्नती देण्यात चालविलेली टाळाटाळ पोलीस अधिकाºयांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
नाशिक पोलीस अकादमीच्या सन २००४ च्या ९५, ९६ व ९७ सत्रात उत्तीर्ण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना कालबद्ध पदोन्नतीने सहायक पोलीस निरीक्षक व त्यानंतर पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली असून, अशी पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादीला अधिक महत्त्व देणे अपेक्षित आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्या पासिंग आउटच्या वेळी जो प्रशिक्षणार्थी प्रथम येतो त्यास सोल्ड आॅफ आॅनरचे पहिले बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते व तुकडीमध्ये त्यास प्रथम क्रमाकांची सेवाज्येष्ठता दिली जाते. जे प्रशिक्षणार्थी नापास होतात त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वेळेस संधी दिली जाते व सहा महिन्यांनंतर ते परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले नाही तर तिसरी संधी देण्यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते व त्यानंतर ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना तुकडीतील सर्वांत शेवटची सेवाज्येष्ठता दिली जाते असे असतानाही सन २००४ च्या सत्र ९५च्या तुकडीतील ३४६ प्रशिक्षणार्थीपैकी ३२० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण झाले व २६ प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाले होते. असे असतानाही जे प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांची सेवाज्येष्ठता मात्र उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या अगोदर दाखविण्यात आली. परिणामी जे प्रशिक्षणार्थी पहिल्या प्रयत्नातच पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण झाले त्यांना सेवाज्येष्ठतेत डावलण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अशोक सहादू गायकवाड व शेख अब्दुल माजिद अब्दुल कादर हे दोन पोलीस उपनिरीक्षक अनुत्तीर्ण झालेले असतानाही त्यांची सेवाज्येष्ठता उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या अगोदर दाखवून त्यांना सहायक निरीक्षक व तेथून थेट पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. याचाच अर्थ गृहखात्याने सेवाज्येष्ठता यादीत प्रचंड घोळ घालून पात्र अधिकाºयांवर अन्याय केला आहे.