सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:17 AM2018-04-23T00:17:29+5:302018-04-23T00:17:29+5:30
मागील वर्षी आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरदेखील आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागील वर्षी कामाला सुरुवात झाली असून, आता हा बहुचर्चित प्रकल्प बऱ्यापैकी पूर्णत्वास आला आहे. शासनाच्या अनुदानातून सर्वसामान्यांचे सात लाख रुपयांत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आडगाव : मागील वर्षी आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरदेखील आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागील वर्षी कामाला सुरुवात झाली असून, आता हा बहुचर्चित प्रकल्प बऱ्यापैकी पूर्णत्वास आला आहे. शासनाच्या अनुदानातून सर्वसामान्यांचे सात लाख रुपयांत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या म्हाडाच्या ४४८ सदनिकांच्या अर्जविक्रीला सोमवार (दि.१६) पासून सुरुवात झाली असून, चार दिवसांत तब्बल ६९ अर्जविक्र ी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख १६ मे आहे. या सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ९ लाख ६० हजार रु पये अधिक जीएसटी इतकी आहे. या सदनिकांसाठी केंद्र शासनाचे १.५० लाख व राज्य शासनाचे १ लाख असे एकूण २.५० लाख अनुदान असून, ७ लाख ५ हजार रुपयांत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सदनिकांची माहिती घेण्यासाठी अनेक जण प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेत आहेत. पण अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वसामान्य माणसाला रोजंदारी व नोकरीतून मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नातून महागाईच्या काळात दिवस काढणे कठीण झाले आहे. पोटाला पीळ देऊन वाचवलेली अवघी काही रक्कम काहींच्या हाताशी आहे. बँकांमधूनही कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी असल्यामुळे व सात लाख रुपये काही दिवसांत जमा करणे कठीण असल्याने हक्काचे घर दिवास्वप्नच राहते की काय,
अशी भावनादेखील काही नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे शासनाने सुलभ हप्त्याने बँकांमार्फत कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.