कोरोना सहायता केंद्राकडून ६०० कुटुंबांना घरपोहोच मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:58 PM2020-04-11T20:58:33+5:302020-04-12T00:29:44+5:30
सिन्नर : सिन्नर नगर परिषद, जनसेवा मंडळासह विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत सुरू केलेल्या कोरोना सहायता केंद्रामार्फत १५ दिवसांत शहर व उपनगरातील स्थलांतरित मजूर, निराधार, गरीब नागरिक असलेल्या ५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले असून, लॉकडाउन वाढण्याची शक्यता विचारात घेऊन केंद्राचे अडीच हजार कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे, दत्ता बोºहाडे यांनी दिली.
सिन्नर : सिन्नर नगर परिषद, जनसेवा मंडळासह विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत सुरू केलेल्या कोरोना सहायता केंद्रामार्फत १५ दिवसांत शहर व उपनगरातील स्थलांतरित मजूर, निराधार, गरीब नागरिक असलेल्या ५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले असून, लॉकडाउन वाढण्याची शक्यता विचारात घेऊन केंद्राचे अडीच हजार कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे, दत्ता बोºहाडे यांनी दिली. सिन्नर नगर परिषदेच्या पुढाकारातून जनसेवा मंडळ, तुफान आलं या, लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी, लायन्स क्लब आॅफ युनिटी, रोटरी क्लब सिन्नर, रोटरी क्लब गोंदेश्वर, कामगार शक्ती, युवामित्र आदी विविध मंडळांनी एकत्रित येत कोरोना सहायता केंद्राची सुरुवात केली. एक देशाचा सैनिक म्हणून मदत करून सैनिक बनावे. मदतकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे, कृष्णाजी भगत, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, प्रमोद चोथवे, दत्ता बोºहाडे, डॉ. महावीर खिंवसरा यांनी सामाजिक संस्थांमार्फत केले आहे.