मालेगावी १ हजार ३१५ रुग्णांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:30 PM2020-08-25T22:30:58+5:302020-08-26T01:13:43+5:30

मालेगाव : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावात दोन आठवड्यांपासून अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या १८२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांकडून शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

Homecoming of 1 thousand 315 patients in Malegaon | मालेगावी १ हजार ३१५ रुग्णांची घरवापसी

मालेगावी १ हजार ३१५ रुग्णांची घरवापसी

Next
ठळक मुद्दे१६८ दिवस उलटूनही शहरवासीयांना कोरोनावर अजूनही मात करता आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावात दोन आठवड्यांपासून अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या १८२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांकडून शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
मालेगावी गेल्या ८ एप्रिल रोजी कोरोनाचे पाच बाधित आढळून आले होते. त्यापैकी एकाचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ झाली होती. २५ आॅगस्टपर्यंत शहरात २ हजार २२७ जणांना कोरोनाची बाधा झाली, तर १ हजार ३१५ जणांनी कोरोनावर मात केली. दुर्दैवाने १०१ जणांचा कोरोनाने बळी घेतला. गेल्या महिनाभरापूर्वी मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर होते. केवळ ६४ रुग्णांवर उपचार सुरू होते; मात्र नागरिकांनी सध्या केलेले असहकार्य व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे शहरातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

सध्या येथील कोविड सेंटरमध्ये १८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज येणाºया अहवालांमधून रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. मालेगावात कोरोनाने थैमान घातले आहे. मृत्युदर कमी असला तरी रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेची बाब ठरत आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीदेखील याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. १६८ दिवस उलटूनही शहरवासीयांना कोरोनावर अजूनही मात करता आली नाही.

Web Title: Homecoming of 1 thousand 315 patients in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.