मनमाड शहरात आठ रुग्णांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:10 PM2020-06-13T21:10:20+5:302020-06-14T01:33:20+5:30

मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रात दाखल असलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांसह आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.

Homecoming of eight patients in Manmad city | मनमाड शहरात आठ रुग्णांची घरवापसी

मनमाड शहरात आठ रुग्णांची घरवापसी

Next

मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रात दाखल असलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांसह आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
मनमाड शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. शहरातील तीन कुटुंबात आढळलेल्या अनेक रुग्णांमुळे प्रशासनाची धावपळ उडाली. या सर्व रु ग्णांवर सेंट झेवियर्स शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहे. शनिवारी या केंद्रातील आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. निमोण चौफुली परिसरात राहणाºया या कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला व तीन बालकांनी कोरोनाला हरविले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी पुष्पगुच्छ देऊन या रुग्णांना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कोरोना केंद्रप्रमुख डॉ. संतोष जगताप, नोडल अधिकारी डॉ. रवींद्र मोरे, डॉ. जयश्री सुर्वे, साधना शिंदे, एकनाथ बनसोडे, महेश देशमुख, विशाल वाघ, अभिजित त्रिभुवन आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मनमाड येथील गुरुद्वारा प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शासन व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्क
वापरून रक्तदान करण्यात आले. यावेळी गुरदीप सिंग, सुरजित कांत हरदीप सिंग चावला, परविंद सिंग ठकराल, सतपाल सिंग कांत, शिवसेनेचे प्रवीण नाईक, संतोष बळीद, संजय कटारिया, बलबीर सिंग कांत, रणजित सिंग, जसरविंदर सिंग ठकराल उपस्थित होते.
--------------------------------------
मनमाडची बाजारपेठ सम विषम पद्धतीने
मनमाड : शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी ८ जूनपासून अनलॉक एकमधील तिसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, त्याअंतर्गत शहरातील दुकाने एक दिवसाआड एका बाजूने उघडण्यात येणार आहे. त्यानुसार शहराची बाजारपेठ यापुढे सम-विषम पद्धतीने सुरू राहील. या आदेशाची अंमलबजावणी सोमवार १५ जूनपासून अमलात येत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली.

Web Title: Homecoming of eight patients in Manmad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक