पाच हजार परप्रांतीयांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:59 PM2020-05-15T21:59:29+5:302020-05-15T23:38:55+5:30

पिंपळगाव बसवंत : लॉकडाउनमुळे रोजगार पूर्णपणे ठप्प झाल्याने बेरोजगार झालेल्या परप्रांतीय नागरिकांना गावाची ओढ लागली आहे. रणरणत्या उन्हात शहराकडून गावाकडे अनवाणी पायपीट करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्न पाण्याच्या सुविधासह परिवहन मंडळाच्या बसेसच्या माध्यमातून घर पाठवणी करण्यात येत आहे.

 Homecoming of five thousand foreigners | पाच हजार परप्रांतीयांची घरवापसी

पाच हजार परप्रांतीयांची घरवापसी

Next

पिंपळगाव बसवंत : लॉकडाउनमुळे रोजगार पूर्णपणे ठप्प झाल्याने बेरोजगार झालेल्या परप्रांतीय नागरिकांना गावाची ओढ लागली आहे. रणरणत्या उन्हात शहराकडून गावाकडे अनवाणी पायपीट करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्न पाण्याच्या सुविधासह परिवहन मंडळाच्या बसेसच्या माध्यमातून घर पाठवणी करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसात पिंपळगाव बसवंत शहरातून ५०४० परप्रांतीय नागरिकांची १२६ बसमधून घर वापसी झाल्याने या परप्रांतीय मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरून आपल्या मूळ गावच्या दिशेने पायी जाणाºया परप्रांतीय मजुरांसाठी राज्य परिवहन खात्याने दिलेल्या आदेशानुसार पिंपळगाव टोल नाका परिसरात परराज्यात जाणाºया नागरिकांसाठी नाव नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले व या केंद्रावर नोंदणी झालेल्या परप्रांतीयांची एका बसमध्ये २२ व कुटुंब व प्रवासी जास्त असल्याने काही बसेसमध्ये ४० चा ग्रुप करून राज्याच्या सीमेपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे. या नाव केंद्रावर निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर, तहसीलदार दीपक पाटील, पिंपळगाव आगारप्रमुख विजय निकम, मंडलाधिकारी नीळकंठ उगले, चंद्रकांत पंडित, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य तथा अन्नछत्र ग्रुपचे गणेश बनकर, आगाराचे संदीप कुठे आदींच्या उपस्थितीत परराज्यात बसेस रवाना करण्यात आल्या.
----------------------------------
पिंपळगावी अन्नछत्र
गेल्या दोन महिन्यापासून पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनातर्फेव सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पिंपळगाव शहरात गोरगरीब व पायपीट करणाºया परप्रांतीय मजुरांच्या एक वेळच्या जेवणासाठी अन्नछत्र सुरू केले आहे. या अन्नछत्राच्या रूपाने आतापर्यंत पन्नास हजारांच्या अधिक लोकांना जेवण वाटप केले आहे. निफाडच्या आमदारांसह, तहसीलदार, तलाठी, आगारप्रमुख व पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य आदी परप्रांतीय मजुरांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Web Title:  Homecoming of five thousand foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक