लासलगाव येथील नऊ कोरोनाबाधितांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:45 PM2020-07-06T23:45:04+5:302020-07-07T01:24:39+5:30
लासलगाव येथील ग्रामीण रु ग्णालयातील कोविड केंद्रामध्ये उपचार घेत असलेले निफाड तालुक्यातील नऊ कोरोनाबाधित रु ग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांची घरवापसी झाली आहे.
लासलगाव : येथील ग्रामीण रु ग्णालयातील कोविड केंद्रामध्ये उपचार घेत असलेले निफाड तालुक्यातील नऊ कोरोनाबाधित रु ग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांची घरवापसी झाली आहे. लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नऊ रुग्णांवर पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात या रुग्णांना निरोप दिला. या केंद्रातून गेल्या दोन महिन्यात ७८ रुग्णांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे.
नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, लासलगाव येथील उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे, बाळकृष्ण अहिरे, आरोग्य सेवक सविता जाधव, पाटेकर, दिलीप जेऊघाले, विजयकुमार पाटील, राजू जाधव, गणेश भवर, प्रकाश गुळवे, ज्ञानेश्वर शिंदे, दत्तू शिंदे, संतोष निरभवणे, घनश्याम माठा आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे साश्रुपूर्ण नयनांनी आभार मानले.