पूरबाधित झाले बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:51 AM2019-08-06T00:51:29+5:302019-08-06T00:52:02+5:30

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून ...

 The homeless were flooded | पूरबाधित झाले बेघर

पूरबाधित झाले बेघर

Next

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या गोरगरिबांचा संसार गोदामाई वाहून घेऊन गेली.
महापुराची तीव्रता बघून अनेक कुटुंबे भयभीत होऊन गणेशवाडी भागातील झाडाखाली तर काहींनी भाजीमंडईकरिता महापालिकेने बांधलेल्या इमारतीत आसरा घेतला. काहींना प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले; मात्र सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले. सामाजिक संवेदनांची जाणीव ठेवत
पंचवटीमधील रहिवाशांनी जमेल तसे आपापल्या खर्चाने स्थलांतरित बेघरांना दोन वेळेचे भोजन उपलब्ध करून देत भूक भागविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
गंगाघाटावर अनेक बेघर राहत असून, दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर अशीच दिनचर्या चालते. रविवारी गोदावरीला आलेल्या पुरानंतर सगळ्यांचीच पळापळ झाली राहायला जागा मिळाली मात्र पोटात अन्नाचा कणही नाही त्यामुळे काय करायचे, असा विचार करत असतानाच पंचवटीतील सुनील धुमाळ, मयूर शिंदे, चेतन गरकळ या तिघा तरु णांनी स्वखर्चाने सुमारे ४०० ते ५०० बेघर स्थलांतरित नागरिकांना सकाळ-सायंकाळ भोजन व्यवस्था करून दिली.
रामवाडी परिसरात तळेनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभागाच्या नगरसेवक भिकूबाई बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल यांनी सुमारे ३०० ते ४०० नागरिकांना दुपारी भोजनाची व्यवस्था करत सामाजिक भावना जोपासली.
पुलालगत असलेल्या झोपडपट्टीला फटका
गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठ परिसरात राहणाऱ्या सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका नदीकाठ भागात राहणाºया मोलमजुरी करणाºया नागरिकांना सर्वाधिक बसला. गाडगे महाराज पुलालगत असलेल्या मरीमाता झोपडपट्टी, अमरधामजवळील झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांना सुखरूपपणे गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले होते.

Web Title:  The homeless were flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.