पेठ तालुक्यात घरपोच अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:58 PM2020-04-09T22:58:46+5:302020-04-09T23:10:31+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरीच असलेल्या गरोदर, स्तनदा माता व बालकांसाठी पेठला घरपोहच पोषण आहार व अंडी वाटप करण्यात आली.

Homemade eggs in Peth taluka | पेठ तालुक्यात घरपोच अंडी

पेठ तालुक्यातील कोहोर येथे बालक व स्तनदा मातांसाठी अंडी वाटप करताना अंगणवाडी सेविका सुमन वाघेरे, मदतनीस पुष्पा मिरके.

Next

पेठ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरीच असलेल्या गरोदर, स्तनदा माता व बालकांसाठी पेठला घरपोहच पोषण आहार व अंडी वाटप करण्यात आली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे मार्फत ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत पहिल्या टप्प्यात २२५२ गरोदर माता यांना अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कर्मचारी यांचे मार्फत घरपोहच कच्चा आहार देण्यात आला. तसेच दुसऱ्या टप्प्यात ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील १३ हजार ६९७ बालकांपैकी ६ हजार ४२२ बालकांना १५ दिवसाची अंडी व केळी वाटप करण्यात आली आहेत. मार्च व एप्रिल या दोन महिन्याचा पूरक आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन निर्देशान्वये ३ ते ६ वर्षे बालकांसाठी घरपोच आहार वाटप चालू आहे. तसेच कोरोनाबाबत सेविका, मदतनीसामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी नम्रता जगताप, बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कव्हाळे यांनी फोन / मेसेजद्वारे कर्मचारीवर्गास सूचना देऊन सुरक्षित कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Homemade eggs in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.